सोलापूर : पुष्पक एक्सप्रेस या धावत्या रेल्वेमध्ये ७-८ दरोडे खोरांच्या टोळीने प्रवेश करून अनेक प्रवाश्यांचे दागिने, रोख रक्कम लुबाडून नेले, यात कहर म्हणजे एक विवाहित महिलेवर याच दरोडेखोरां मधल्या ४- ५ जणांनी अमानुष अत्याचार केले. यामध्ये ती महिला गंभीर जखमी झाली, यावरून रेल्वे मध्ये सुद्धा महिला सुरक्षित नाही अशा घटनेवरून दिसून येते. अशा अमानुष घटनेचा राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या वतीने घटनेचा धिक्कार व निषेध करण्यात आला,
रविवारी प्रदेश उपाध्यक्ष विद्या लोलगे, उपाध्यक्ष लता फुटाणे, वंदना भिसे, लता ढेरे, नीला खांडेकर मनीषा नलावडे, वसीमताई खान, सुनंदा साळुंखे या महिला पदाधिकारी विभागीय रेल्वे मॅनेजर यांच्या कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी निवेदन स्वीकारायला कोणीही नव्हते त्यामुळे रेल्वे प्रशासनाचा निषेध करत त्यांनी मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला असलेल्या रेल्वे इंजिनवर निवेदन चिटकवून निषेधार्थ घोषणाबाजी केली.यावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली
विद्या लोलगे म्हणाल्या, धावत्या रेल्वेमध्ये अशा घटना घडत असताना रेल्वे प्रशासन व पोलिस झोपले होते का? अशा घटना घडू नये यासाठी त्वरित उपाय योजना करून आरोपिना त्वरित पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि या घटनेची नैतिक जबाबदारी स्विकारून रेल्वे राज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.


















