सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आमचा गाव आमचा विकास या योजनेमध्ये पंढरपूर तालुक्यात सुमारे चार लाख 74 हजाराचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले असून यामध्ये पंढरपूरचे तत्कालीन गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे, या योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्याला आलेल्या 54 लाखाच्या निधीची चौकशी करावी तसेच तत्कालीन गटविकास अधिकारी रविकिरण घोडके याला नोकरीतून निलंबित करावे अशी मागणी जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य वसंतराव देशमुख तसेच माझं माजी सभापती रजनीताई देशमुख यांनी केली आहे .
पंढरपूर येथील आमचा गांव आमचा विकास (GPGP) चा उपक्रमाअंतर्गत सन २०२०-२०२१ या अर्थिक वर्षात तालुका व ग्रामस्तरावरील प्रशिक्षण न घेता बिले काढले बाबत व संपुर्ण आर्थिक योजनेची बाबीची चौकशी बाबत तक्रार अर्ज जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख माजी सभापती रजनी देशमुख यांच्यासह पंढरपूर पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती तसेच जिल्हा परिषदेच्या तालुक्यातील सर्व सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. त्याची चौकशी होऊन अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालानंतर वसंतराव देशमुख व बाळासाहेब देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली
ही योजना राबविताना शासन निर्णय, उदयोग, ऊर्जा व कामगार विभाग महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई शासन निर्णय क्र.भांखस- २०१४ /प्र.क्र.८२/भाग-३/उदयोग ४/ दि. ०१/१२/२०१६ नुसार कोटेशन पध्दत अवलंबिताना अटी व शर्तीमुसार रवविण्यात आल्याचे दिसून येत नाही. उपरोक्त शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार योजनेची व्यापक प्रचार व प्रसिध्दी न केल्याचे दिसून आले.
उपस्थित प्रशिक्षणार्थी यांचे हजरपट उपलब्ध झाले नाही. देयका सोबत खर्च मंजुर आदेश नाही. पूरवठा आदेश दिसून येत नाही.
संबंधित महिला बचत गटांना रक्कम मिळाल्याच्या पोहोच पावती नस्तीस दिसून येत नाही.. शशांक य वर्वे कार्यासनन अधिकारी, महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग, मुंबई यांचेकडील पत्र क्र. रामास्व२०२० / प्र.क्र. ५२/ आस्था १५ दि. ३० सप्टेंबर २०२० अन्वये प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार उपस्थित प्रशिक्षणार्थीसाठी जेवण व अल्पोपहाराची व्यवस्था प्रशिक्षण स्थळी न करता प्रत्येक प्रशिक्षणार्थीला भोजन व अल्पोपहार भत्ता दयावा. नमूद असून या बाबत कार्यवाही करण्यात आले नाही.
तालुक्यातील १६ गणामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आलेले आहे. परंतु सदर कार्यक्रमांचे फोटो, उपस्थिती पत्रके, मुल्यमापन अहवाल इ. बावी नस्ती सोबत तपासणीस उपलब्ध झाले नाही. बँक स्टेटमेंट तपासली असता १६ ग्रामपंचायतीचे प्राप्त अनुदान संबंधित ग्रामसेवकांच्या
वैयक्तीक बँक खात्यावर सदर अनुदान जमा करण्यात आल्याचे दिसून आले. ग्रामसेवक यांनी सदर योजने अंतर्गतची खर्चाची ग.वि.अ. कार्यालयाकडील तयार प्रमाणके पेड वाय मी म्हणून ग्रामसेवकांची स्वाक्षरी असल्याचे दिसून आले.
ग्रामसेवकांच्या वैयक्तीक खात्यात ग.वि.अ. कार्यालयाने योजना राबविण्यासाठीचे अनुदान जमा असल्याचे दिसून आले अनुषंगाने वैयक्तीक खात्यात जमा झालेले अनुदान हे शासकिय लेखाशिर्ष खाती जमा करणे अपेक्षीत होते व परंतु तशी कार्यवाही ग्रामसेवकांनी केलेली दिसून येत नाही.
सदरची रक्कम ग्रामसेवक यांच्या खात्यावर परस्पर जमा केल्याची बाब ग्रामसेवकांनी वरिष्ठांच्या निदर्शनास आणुन देणे आवश्यक होते. तशी कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. सदर कार्यक्रम विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी ग्रामसेवकांकडून शासकीय नियमानुसार मार्गदर्शन करुन कार्यक्रम राबविणे आवश्यक असताना सदर कार्यक्रम न राबविता सदर योजनेचे रक्कम विस्तार अधिकारी यांनी पाठपुरवा करुन ग्रामसेवकच्या खात्यातील रक्कम तगादा लावून ग्रामसेवक यांच्या कडून रोख स्वरुपात स्वीकारली असल्याचे ग्रामसेवकांच्या दि. २८/०९/२०२१ च्या जबाबात नमूद केले आहे.
वरील त्रुटी बाबतीत तपासणी पथक प्रमुख्य यांनी याबाबत उपस्थित ग्रामसेवकानां विचारले असता उपस्थित ग्रामसेवकानी या बाबत सर्वानी मिळून स्वत चे जबाब लिहन दिले आहेत त्यामध्ये
त्यांनी त्यांच्या वैयक्तीक बँक खात्यात दि. २५/०५/२०२१ रोजी रक्कम जमा झालेले आहेत. त्याचवेळी | पंचायत समिती चे वरील तीन्ही विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी जमा झालेल्या अनुदानची रक्कम | ग्रामसेवकांना पारंवार विचारणा करन सदर रक्कम ग्रामसेवकांनी खात्यातून काढून रोख मा. गटविकास | अधिकारी यांचे कडे जमा करणेस सांगितले विस्तार अधिकारी यांनी सतत पाठपुरावा केलेने आमच्या खात्यात जमा झालेली रक्कम रोख स्वरुपात ग.वि.अ यांच्याकडे रोख जगा केलेले आहे तसेच ग.वि.अ. परस्पर चूकीच्या पध्दतीने प्रमाणके तयार करुन सदर निधी खर्च करण्यात आले आहे. असे ग्रामसेवकानी लेखी जवावात नमूद केलेले आहे. सदर आमचा गाव आमचा विकास या उपक्रमा अंतर्गत कोणतेही तपशील, आदेश, ग्रामसेवक यांना नसलेचे ग्रामसेवकानी जबाबात नमूद केले आहे..
आमचा गांव आमचा विकास अंतर्गत प्राप्त अनुदन गटविकास अधिकारी यांनी | ग्रामपंचायतीच्या संयुक्त खात्यावर अनुदान जमा न करता ग्रामसेवकांच्या वैयक्तीक खात्यावर निधी वर्ग | केल्याचे दिसून आले.
गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवकांच्या वैयक्तीक खात्यात रक्कम कोणत्या नियमाद्वारे निधी वर्ग केले हे समजून येत नाही. गटविकास अधिकारी यांनी निधी खर्च करताना | योजनेच्या मार्गदर्शक सूचना व शासन निर्णय याकडे लक्ष न देता सदर योजनेचे निधी गैरप्रकाराने खर्च केल्याचे दिसून येते.


















