नारायण राणे यांनी काल केलेल्या वक्तव्यानंतर नाशिक पुणे आणि रत्नागिरी येथे गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर राज्यात विविध ठिकाणी राणे यांच्या विरोधात शिवसैनिकांनी आंदोलन सुरू केले आहे. याच पार्श्वभूमीवर राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी रत्नागिरी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो दुपारी फेटाळण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानाखाली वाजवली असती असे वक्तव्य केल्यानंतर ठिकाणी त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान आज सकाळी महाजनादेश यात्रेचा निमित्ताने संगमेश्वर तालुक्यात राणे आले असतानाच त्यांना अटक होईल असा त्यांचा अंदाज होता.
मात्र तोपर्यंत त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर राणे यांना अटक करण्यात आली. दरम्यान रात्री उशिरा महाडमधील स्थानिक न्यायालयाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मंजूर केला राणे यांना महाड एमआयडीसी पोलिसांनी रात्री उशिरा नंतर न्यायालयात हजर केले होते. राणे यांनी मुख्यमंत्र्यांना बद्दल केलेले वक्तव्य आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात उमटलेले पडसाद या पार्श्वभूमीवर आता आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत हा विषय चांगलाच पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



















