सोलापूर जिल्हा काँग्रेसचे नूतन अध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास काँग्रेस भवन मध्ये येऊन पदभार घेतला वाजत-गाजत पारंपारिक पद्धतीने त्यांचे काँग्रेस भवनात स्वागत करण्यात आले काँग्रेस भवनाला मागील दोन दिवसापासून सजवण्यात आले होते गुलाबाच्या पाकळ्यानी त्यांचे स्वागत झाले,
प्रवेशद्वारावर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुरेश हसापुरे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष हरीश पाटील मोतीराम चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले जिल्हाध्यक्ष कार्यालयात प्रवेश करताच माजी आमदार रामहरी रुपनवर शहर अध्यक्ष प्रकाश वाले गटनेते चेतन नरोटे, बसवराज बगले यांनी धवलसिंह मोहिते-पाटील यांना जिल्हाध्यक्षच्या खुर्चीवर बसवले
त्यानंतर माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी,शहर कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांनी त्यांचा सत्कार केला शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या केबिनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना विस्कळीत झालेल्या काँग्रेसला पुन्हा घडी बसविण्यास सह जिल्ह्यातील सर्व नेत्यांची समन्वय ठेवून काँग्रेसला जिल्ह्यात उभारी देईन असे सांगतानाच त्यांनी जिल्हाध्यक्षांचा कामकाजाची पद्धत पुढील काळात कशा पद्धतीने राहिल याची माहिती दिली



















