राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता काही वेळापूर्वीच सोलापूरच्या होटगी रोड विमानतळावर शासकीय विमानाने दाखल झाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आहेत. यावेळी त्यांचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, सहाय्यक जिल्हाधिकारी मनिष आव्हाळे यांच्यावतीने स्वागत करण्यात आले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे, शहरप्रमुख मनोज शेजवाळ यांनी स्वागत केले. त्यानंतर ते आपल्या शासकीय वाहनाने पंढरपूरकडे रवाना झाले आहेत.
येत्या 29 जून रोजी आषाढी एकादशी असल्याने पंढरपूर मध्ये ते आढावा घेत आहेत. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने आषाढी वारीच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे स्वतः या शिबिराकडे लक्ष देऊन आहेत. त्याचीही पाहणी मुख्यमंत्री करणार आहेत तसेच एकूणच एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मध्ये जिल्हा प्रशासनाने केलेल्या सोयी सुविधा याचीही माहिती घेणार आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह सोमवार 26 जानेवारी सोलापुरात येत आहेत. ते पांडुरंगाचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याच्या अगोदरच आपले मुख्यमंत्री होण्यासाठी पंढरपुरात आल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.





















