उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा गावांमध्ये ग्रामपंचायतची निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये भिंगारे आणि भोसले गट एकमेका विरुद्ध उभे आहेत दरम्यान सकाळच्या सुमारास बारा वाजेपर्यंत गावांमध्ये शांततेत मतदान सुरू होते दुपारी अचानक प्रभाग क्रमांक एक मध्ये बोगस मतदान होत असल्याची चर्चा गावांमध्ये फिरले त्यानंतर भोसले आणि भिंगारे गट एकमेकांसमोर आले मोठा जमाव त्या ठिकाणी जमा झाला आणि त्याचे रूपांतर दगडफेकीत झाले, या दगडफेकीत भोसले गटाचा एक जण गंभीर जखमी झाला.. ही माहिती मिळताच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तळे हिप्परगा गावात दाखल झाला, पोलिसांनी जमावाला पांगापांग केली त्यानंतर काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.
जन्मठेप शिक्षा झालेल्या आरोपीला उच्च न्यायालयात जामीन मंजुर
जन्मठेप शिक्षा झालेल्या आरोपीला उच्च न्यायालयात जामीन मंजुर सारोळे ता. बार्शी येथे पत्नी मिनाक्षी साबळे हिचा खुन केल्याच्या आरोपावरुन जन्मठेप...