जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची दि. ०९.०७.२०२१ रोजी बैठक आयोजित करणेत आलेली होती. सदर बैठकीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये (ग्रामीण क्षेत्र) कोव्हीड बाधीत रुग्णांचा दि. ०८.०७.२०२१ रोजीचा पॉझिटीव्हीटी रेट हा ५.३३% असून ऑक्सिजन बेडस व्यापलेली टक्केवारी ९.१५% असल्याने महाराष्ट्र शासनाकडील दि. ०४.०६.२०२१ व दि. २५.६.२०२९ अन्वये देण्यात आलेल्या निर्देशाप्रमाणे सोलापूर जिल्हा निबंध स्तर-३ मध्ये अंतर्भूत होत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये सर्वानुमते शासनाच्या निर्देशाप्रमाणे सोलापूर जिल्ह्यासाठी स्तर-३ चे दि. ०७.०६.२०२१ पासून लागू केलेल्या निर्बंधांना पुढील आदेश होईपर्यंत मुदतवाढ देणेबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्याअर्थी, सोलापूर महानगरपालिका प्रशासकीय क्षेत्र वगळून, सोलापूर जिल्हा ग्रामीण क्षेत्र वेगळा प्रशासकीय घटक मानण्यात येत आहे. यानुसार सोलापूर जिल्हा (ग्रामीण क्षेत्र) मधील कोव्हीड-१९ चा दि. ०८.०७.२०२१ रोजीचा पॉझिटीव्हीटी दर ५.३३% असून वापरण्यात आलेले ऑक्सिजन बेड ची टक्केवारी (The Occupancy of total Oxygen Beds) दर हा ९.१५% आहे.
ज्याअर्थी, शासनाने निश्चित केलेल्या एकूण पाच स्तरांपैकी सोलापूर जिल्हा (सोलापूर महानगरपालिका प्रशासकीय क्षेत्र वगळून) हा प्रशासकीय घटक तीसऱ्या स्तरामध्ये समाविष्ट होत आहे.





















