सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मिलिंद शंभरकर यांनी मंगळवार पाच ऑक्टोबर रोजी नवे आदेश पारित केले, यामध्ये येत्या सात ऑक्टोबरपासून ग्रामीण भागातील सर्व मंदिरे व प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे.
मात्र हे आदेश देताना त्यांनी नियम व अटी घालून दिले आहेत सोशल डिस्टन्स पाळून मास्कचा वापर करून मंदिरात प्रवेश करण्याच्या सूचना आहेत, मंदिरे उघडण्याची वेळ आणि आत मध्ये प्रवेश करणाऱ्या भाविकांची संख्या निश्चित करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत, त्याचबरोबर ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढू नये याची काळजी घेण्यासाठी विविध नियम व अटी घालून दिले आहेत काय आहेत जिल्हाधिकारी शंभरकर यांचे नवे आदेश पहा






















