सोलापूर : महाराष्ट्र प्रदेश सेवादल यंग ब्रिगेडचे अध्यक्ष सुदीप चाकोते यांच्या नेतृत्वाखाली महागाई गॅस दरवाढीच्या विरोधात तसेच जिवनावश्यक वस्तुच्या दरवादीच्या विरोधात मंगळवार बाजार परिसरात कुंभार वेसीत निदर्शने केली या सर्वांनी महापालिका आयुक्त व पोलीस उपआयुक्त यांच्या आदेशाचे उल्लंघन करून गैरकायदयाची मंडळी जमवुन केंद्रशासनाच्या विरोधात घोषणा देवून मानवी सुरक्षीतता धोक्यात येईल असे कृत्य केले, कोरोना संसर्ग पसरवण्याचे हयगयीने कृती केली आहे त्यामुळे सुदीप चाकोते, नुरमहमद नालवार, श्रीकांत दासरी, आकाश विपरादी, संतोष रोहीटे, गौस कल्याणी यांच्या विरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याच बरोबर मंगळवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कस्तुरबा मार्केट परिसरातील लिंग शेट्टी मंगल कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात कोरूना प्रतिबंधक नियम डावलल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष हजरत हुसेन बडेखान, विनोद इंगळे, बाळासाहेब बनसोडे , अकिल शाक्य, रवि थोरात, अजित नागटिळक, अभिजीत गायकवाड, विक्रांत गायकवाड यांच्यावर जोड भावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

















