उजनीची दुहेरी पाईपलाईन येत्या दहा महिन्यांत पूर्ण करण्यासह दोनशे बेडचे हॉस्पिटल युद्धपातळीवर पूर्ण करणार अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक मे महाराष्ट्र दिनी दिली.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी आठ वाजता शासकीय ध्वजारोहण पार पडले यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर महापालिका आयुक्त पी शिवशंकर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती त्यानंतरही पत्रकारांनी त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता सुरुवातीला त्यांनी आचारसंहिता असल्याने बोलण्यास नकार दिला आणि ते जिल्हाधिकारी कार्यालयात निघून गेले त्यानंतर पत्रकार बाहेर थांबले होते पालकमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडताना त्यांनी पत्रकारांना पाहिले आणि त्यांनी लगेच गाडी थांबवली ते स्वतः खाली उतरले आणि पत्रकारांशी गप्पा मारल्या मागील काही दिवसापासून उजनी धरणातून इंदापूरला पाच टीएमसी पाणी पालकमंत्री पळवणार अशा बातम्या माध्यमांमधून येत आहेत त्यावरून सोलापूरकरांमध्ये भरणे मामा यांच्यावर रोष निर्माण झाला आहे याच पार्श्वभूमीवर त्यांनी उजनी धरणाचं संपूर्ण नियोजन झालेलं आहे त्या नियोजनातील एक थेंब पाणी मी इंदापूरला नेणार नाही असं पुन्हा त्यांनी सांगितलं माझी तीन महिन्यापूर्वी व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली तो विषय वेगळा होता असे सांगतानाच आता सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याची मागणी वाढत आहे त्यासाठी दुहेरी पाईपलाईन उजनी वरून करणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी 30 एप्रिल रोजी नियोजन भवन मध्ये बैठक घेतली संपूर्ण माहिती दुहेरी पाइपलाइनची घेतल्यानंतर निधीची कमतरता समोर आली मात्र कोणताही निधी कमी पडू देणार नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री स्तरावरून ताबडतोब निधी आणून ही दुहेरी पाईपलाईन येत्या दहा महिन्यात पूर्ण करेन असा विश्वास पालकमंत्री यांनी व्यक्त केला मात्र सुरुवातीला उन्हाळ्याचे दिवस असल्याने या पाईपलाईनच्या जॅकवेलचे काम त्वरित पूर्ण करा अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत, त्याचबरोबर गुरुनानक चौकातील शंभर बेडचे महिला हॉस्पिटल व शंभर बेडचे सिव्हिल हॉस्पिटलचे काम युद्धपातळीवर सुरू आहे जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता हे काम ताबडतोब करण्याच्या सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शेलार यांना दिल्या शेलार यांना बोलावून त्यांच्या तोंडून पालकमंत्र्यांनी हे सर्व वदवून घेतले ,त्याच बरोबर 1 मे पासून वय 18 च्या पुढील नागरिकांना राज्यात लसीकरण मोहीम सुरू झाली आहे ्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांमध्ये सर्वत्र लसीकरण केंद्र वाढवण्या सह केंद्रांवर गर्दी न करता लसीकरण करून घ्यावे असे आवाहन पालकमंत्री भरणे यांनी केले आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने गाव ते ते कोविड केअर सेंटर उभारण्यात येणाऱ्या उपक्रमाची त्यांनी पाहणी केली याच दरम्यान पंढरपूर तालुक्यातील करकंब या ठिकाणी उभारण्यात आलेल्या कोविल सेंटरचे विशेष कौतुक केले.


















