सोलापुर जिल्हयातील सर्व आशा वर्कस गटप्रवर्तक मधील महिला संपूर्ण महाराष्ट्रात अनेक महिला माध्यामातुन काम करित आहेत. दिनांक 25/05/2021 रोजी राजेश टोपे आरोग्य मंत्री महाराष्ट्र मुंबई यांनी आशा वर्कर्स यांना लसीकरणाचे टेस्टींग प्रशिक्षण देणार असल्याबाबत पत्रकार परिषदमध्ये घोषित केलेले होते त्याबाबतची बातमी डेलीहन्ट या अॅल्पिककेशनवर प्रसारीत झालेली होती
त्याचा युआरएल आयडी http://dhunt.in/g18iEsaanduutbx3d596287a39441d7andsspd असा आहे.
या बातमीवर अनेक लोकांनी कर्मेट केलेल्या होत्या, त्यापैकी डेलीहन्ट या अल्य्किशनवर Aadal Aale bbbaaa6563795360205 असे प्रोफाईल आयडी असलेल्या युजरने आशा वर्कर्स यांना उददेशुन अतिशय घाणेरडे असे अश्लील भाषेत मजकुन टाईप करुन कमैट केलेली आहे. त्यामुळे या युजरने आशा सेविकांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणून त्याचे विरुध्द कायदेशीर कारवाई होणेकरिता लालबावटा आशा वर्कर्स गटप्रवर्तक युनियनच्या पुष्पा पाटील यांनी दि-31/05/2021 रोजी पोलीस आयुक्त सोलापुर शहर यांचेकडे तक्रार अर्ज दाखल केला. अर्जाच्या चौकशी मध्ये पोलीसांनी मॅनेजर डेलीहन्ट न्युज याना या युजरचे प्रोफाईल आयडी वरुन सदर युजरची माहीती मिळणेकामी मेलव्दारे सदर पत्रव्यहार करून माहीती भागवलि असता, मॅनेजर डेलीहन्ट न्युज यांचेकडे सदर युजरची तांत्रिक माहिती प्राप्त झाली त्या प्राप्त झालेल्या तंत्रिक माहीती वरुन पोलीसांनी गुगल कंपनीस सदर युजर याचे मोबाईल नंबर व ईतर तांत्रिक माहीती मागवुन घेतली असता सदर युजर हा मोबाईल नं 9503224399, 9049915537 व 9730988827 असे वापरत असल्याबाबतची माहिती मिळुन आलेली आहे. यावरून संबंधित डेलिहंट युजरवर भारतीय दंड संहिता 507 व माहिती तंत्रज्ञान कलम 67 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



















