सोलापूर, दि. 16 : मोहोळ तालुक्यातील अनगर-कोंबडवाडी, खंडोबाचीवाडी, नालबंदवाडी आणि कुरणवाडी या चार ग्रामपंचायतीचे रूपांतर अनगर नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
अधिसूचना राज्य शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या कालावधीत लेखी कारणे, आक्षेप जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे सादर करावेत, असे अधिसूचनेत म्हटले आहे.
मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनगर ग्रामपंचायत मागील वर्षानुवर्ष बिनविरोध राहिली आहे त्याचबरोबर आजूबाजूचे अनेक ग्रामपंचायतीवर राजन पाटील यांचे वर्चस्व असून राष्ट्रवादीची सत्ता आहे त्यामुळे अनगर नगरपंचायत झाल्यानंतर त्यावरही निश्चित राजन पाटील यांचेच वर्चस्व राहील यात शंका नाही.



















