सोलापूर, दि. 2 : मोहोळ तालुक्यातील अनगर-कोंबडवाडी, खंडोबाचीवाडी, नालबंदवाडी आणि कुरणवाडी या चार ग्रामपंचायतीचे रूपांतर अनगर नगरपंचायतीमध्ये रूपांतर करून राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यामुळे मोहोळ तालुक्यातील मोहोळ नंतर अनगर ही दुसरी नगरपंचायत झाली आहे त्यामुळे अनगर जिल्हा परिषद मतदारसंघ संपुष्टात आला आहे. राज्य शासनाची अधिसूचना जारी होताच मोहोळ तालुक्यातील माजी आमदार राजन पाटील यांच्या समर्थकांनी जल्लोष केला आहे अनगर सह अनेक ग्रामपंचायतींवर राजन पाटील यांचे कायमच एक हाती वर्चस्व राहिले आहे.
नगर विकास विभागाने एक नोव्हेंबर 2021 रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली असून त्यामध्ये दिनांक १४ सप्टेंबर, २०२१ यामध्ये उदघोषणा प्रसिध्द केली असून, महाराष्ट्र शासनाने सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत अनगर-कोंबडवाडी, ग्रामपंचायत खंडोबाचीवाडी ग्रामपंचायत नालबंदवाडी व ग्रामपंचायत कुरणवाडी (अनगर) या ४ ग्रामपंचायतींचे स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित होणारे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणुन विनिर्दिष्ट करण्यासाठी व उक्त संक्रमणात्मक क्षेत्रासाठी “अनगर नगरपंचायत” या नावाने नगरपंचायत घटीत करण्यासाठी, उक्त अधिनियमाचे कलम ३४१ क चे पोट-कलम (१), (१ख), (२) आणि कलम ३ चे पोटकलम (३) या अन्वये अधिसूचना काढण्याच्या आपल्या प्रस्तावावर आक्षेप मागविले होते;
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती उल्लेख “उक्त अधिनियम” असा करण्यात आला आहे.) याच्या कलम ३४१ क चे पोट-कलम (१), व औद्योगिक (१ख), (२) आणि कलम ३ चे पोटकलम (३) यांच्या तरतुदीनुसार, शासन उद्घोषणा, नगर विकास नगरी अधिनियम, १९६५. आणि ज्याअर्थी शासन उद्घोषणा नगर विकास विभाग एमयुएन-२०२१/प्र.क्र.२८९/नवि- १८, दि. १६.०९.२०२१ स्थानिक वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्द करण्यात आली होती.
आणि ज्याअर्थी, उक्त उद्घोषणेमध्ये नमूद कालावधीत जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्याकडे एकही आक्षेप प्राप्त झालेला नाही;

















