सोलापूर : 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिवसा निमित्त पद्मशाली शिक्षण संस्था संचलित मातोश्री जनाबाई जनार्दन बिटला प्रशालेच्या वतीने अनोखा उपक्रम राबविण्यात आला. ओझोन चे महत्व समजावण्यासाठी दोन छत्र्यांचा उपयोग करण्यात आला.
एक छत्री चांगली होती आणि दुसरी छिद्र पडलेली. यावरून ओझोन आवरणाला छिद्र पडल्यामुळे काय होऊ शकते हे सांगण्यात आले. या उपक्रमातून ओझोन चे महत्त्व सांगण्यात आले. यासाठी प्रशालेतील पर्यावरणाचे शिक्षक अभिज भानप यांनी मार्गदर्शन केले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शारदा गोरटयाल यांनी या उपक्रमाचे कौतुक करून सोप्या पद्धतीने जनजागृती केल्याबद्दल अभिनंदन केले.




















