सोलापूर : मागील आठ दिवस बार्शी शहराचे नाव संपूर्ण देशभरात गाजत होते. तो बिग बुल शेअर मार्केट घोटाळ्यातील प्रमुख आरोपी म्हणून समोर आलेला विशाल फाटे याने स्वतःहून यूट्यूब चैनल वर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने संपूर्ण स्पष्टीकरण देत माझ्या जवळच्या पोलिस ठाण्यात मी हजर होणार असल्याचे सांगितले आहे.
ज्यांना माझ्यावर विश्वास आहे त्यांनी काही दिवस थांबावे ज्यांना विश्वास नाही त्यांनी पोलिसात जावे फाशी झाली तर बेहत्तर परंतु आता सहन होत नाही. माझ्या कंपनीमध्ये केवळ माझ्या वडिलांचे नाव असून ते कोणतेही लाभार्थी नाहीत, एवढी बदनामी सहन होत नाही मी माझी पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलीला घेऊन आत्महत्या करणार होतो मात्र आता पोलीस ठाण्यात हजर होण्याचा मी निर्णय घेतला आहे अशी माहिती स्वतः विशाल फाटे यांनी दिली आहे पहा तो काय म्हणत आहे संपूर्ण व्हिडिओ…..


















