सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने देशाच्या पंच्याहत्तर व्या अमृतमहोत्सवानिमित्त व्यर्थ न हो बलिदान अंतर्गत महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष प्रकाश वाले, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार नगरसेवक विनोद भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्षाबंधनानिमित्त बाॅर्डरवर देशाचे रक्षण करणा-या सैनिकांना राख्या पाठविण्यात आल्या.
आपले घरदार आपल्या कुटुंबापासून दूर राहून बाॅर्डरवर राहून देशाचे किंबहूना आपल्या सर्वांचे रक्षण करणारे जवान सैनिक लढतात त्यामुळे आपण आपला देश सुरक्षित आहे. रक्षण करणा-या सैनिक भावा बहिणीचे नाते अतूट व घट्ट होण्यासाठी आज आम्ही महिला काँग्रेसच्या भगीनी ह्या राख्या पाठवून आमच्या भावना त्यांच्यापर्यत पोहचवत आहोत असे उद्गार सोलापूर शहर महिला अध्यक्ष चिंचोळकर यांनी काढले.
यावेळी नलिनी चंदेले, सुमन जाधव, प्रमिला तुपलवंडे, शोभा बोबे, रतन डोळसे, नंदा कांगरे, संतोषी गुंडे,अंजली मंगोडेकर, बसंती साळुंके, मुमताज तांबोळी, सुरेखा घाडगे, जगदेवी कदम,मुनेराबी शेख, वैशाली गौड, तिरुपती परकीपंडला,ब्लाॅक अध्यक्षा देवा गायकवाड, अंबादास गुंत्तीकोंड, सोपान थोरात, हाजिमलम नदाफ, सुनिल व्हटकर, लक्ष्मीनारायण दासरी, बसवराज म्हेत्रे, राहुल बोळकोटे, मारुती शेख, व्ही.डी.गायकवाड, गोविंद कांबळे, सिद्राम अट्टेललु, आदि पदाधिकारी सह कार्यकत्या उपस्थित होत्या.

















