सोलापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदी जालण्याचे बाळासाहेब राजाराम शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे यांची बदली ही विनंतीनुसार झालेली आहे.
तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांच्या बदली नंतर रिक्त झालेल्या त्यांच्या जागी कृषी उपसंचालक रविंद्र माने यांच्याकडे बराच महिने पदभार होता मात्र माने यांच्या पत्नी सुवर्णा माने या वनविभागात मोठ्या पदावर अधिकारी असल्याने त्यांची अहमदनगर जिल्ह्यात बदली झाली त्यामुळे रवींद्र माने यांची ही नगर जिल्ह्यात कृषी उपसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे हे पद रिक्त होते.
दरम्यान राज्याच्या कृषी विभागाने 29 ऑगस्ट रोजी बाळासाहेब शिंदे यांची सोलापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदी नियुक्ती केली. शिंदे हे लवकरच पदभार घेतील.
बाळासाहेब शिंदे हे माढा तालुक्यातील सापटणे गावचे रहिवासी असून सर्वसामान्य कुटुंबातून त्यांनी शिक्षण घेत या पदावर पोहोचले आहेत.त्यांचे बंधू माळशिरस पंचायत समिती मध्ये मोठ्या पदावर असल्याचे समजते. जिल्ह्यातील अधिकारी कृषी विभागाला मिळाल्याने निश्चितच शेतीला चालना मिळेल यात शंका नाही.



















