अकलूजच्या धवलसिंह मोहिते पाटलांचा नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश झाला, धवलसिंह मोहिते पाटील हे शिवसेनेत असूनही नाराज होते, विधान सभा दरम्यान ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात गेले होते, मात्र त्यांची अपेक्षाभंग झाला त्यांनी शेवटी काँग्रेसमध्ये जाणे पसंद केले या प्रवेश कार्यक्रमास ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, आमदार धीरज देशमुख, हुसेन दलवाई, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी धवलसिंहाना काँग्रेस प्रवेशाच्या शुभेच्छा देताना आता एकच लक्ष ठेवा ते म्हणजे सोलापूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा अध्यक्ष करणे. जिल्ह्याचे दौरे करा पक्षसंघटन मजबूत करा अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या . सोलापूर जिल्हा परिषदेचा इतिहास पाहिला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापने पूर्वी काँग्रेसची एकहाती सत्ता झेडपीत होती, मात्र 1999 ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून एकदाही काँग्रेसचा अध्यक्ष जिल्हा परिषदेत झाला नाही सभापती पदेही काँग्रेसला राजकिय ऍडजेस्टमेंट किंवा राज्यात काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीचे घोरण ठरल्यानंतर मिळाली आहेत .बाळासाहेब थोरात यांच्या वक्तव्यानंतर त्याची चर्चा जिल्हा परिषदेत झाली राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हाअध्यक्ष बळीराम काका साठे यांच्यासमोर हा विषय काढला असता त्यांनी स्मित हास्य करत सुरुवातीला बोलण्यास नकार दिला मात्र सध्याची सोलापूर जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहता हे आता तरी शक्य नाही काँग्रेसची ताकद तुम्हीच बघा किती तालुक्यात आहे असे सांगून काका साठे यांनी जिल्ह्यातील काँग्रेसचे वास्तव पत्रकारांसमोर मांडले. आता धवलसिंह हे आल्यानंतर त्यांच्यावर कोणती जबाबदारी मिळते हे सुद्धा पाहणे महत्वाचे ठरणार आहे.