सोलापूर जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे त्यामध्ये बार्शी तालुक्यातील सुद्धा काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत त्यासाठी निवडणूक निरिक्षक म्हणून प्रांताधिकारी हेमंत निकम यांची नियुक्ती करण्यात आली, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बार्शीचे तहसीलदार प्रदीप शेलार हे काम पाहत आहेत मात्र या निवडणुकीमध्ये उपविभागीय अधिकारी क्रमांक एक सोलापूर हेमंत निकम हे आपल्या पदाचा गैरवापर करत असल्याची गंभीर तक्रार एका पत्राद्वारे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार प्रदीप शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती या तक्रारीची त्वरित दखल निवडणूक आयोगाने घेतली आणि पुणे विभागीय आयुक्त सौरभ यांना निवडणूक निरीक्षक बदलाच्या सूचना केल्या निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर विभागीय आयुक्त राव यांनी लगेच हेमंत निकम यांना निवडणूक निरीक्षक पदावरून काढले आणि त्यांच्या जागेवर अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांची निवडणूक निरीक्षक म्हणून त्वरित नियुक्ती केली संजीव जाधव यांना सहाय्यक निवडणूक निरिक्षक म्हणून हेमंत निकम हे यापुढे मदत करतील अशा सूचना विभागीय आयुक्त सौरव राव यांनी केल्या आहेत सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक दरम्यान पहिल्यांदाच एका तहसीलदाराने प्रांत अधिकार्यांच्या मनमानी कारभाराविरोधात अशी तक्रार निवडणूक आयोगाला थेट केल्याचं चित्र असून त्याची दखल ही निवडणूक आयोगाने त्वरित घेतली आहे हेमंत निकम हे कायमच वादग्रस्त राहिले आहे त्यांच्याबाबत प्रशासनाकडे अनेक तक्रारी यापूर्वीही केल्या गेल्या आहेत त्यांच्या मनमानी कारभाराबाबत लोकप्रतिनिधी मधून ही नाराजीचा सूर आहे.