भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय पुणे, अभिजीत कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेस सोलापूर व रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापुर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक ०१ जुलै २०२१ रोजी सायंकाळी ०५ ते ०६ या दरम्यान ” *बारावी नंतर करीअरच्या संधी* ” या विषयावर ऑनलाइन वेबिनार(व्याख्यान) चे आयोजन करण्यात आले आहे. थोड्याच दिवसात बारावीचा निकाल जाहीर होईल व त्यानंतर विद्यार्थी तसेच पालक यांच्यासमोर पुढे कुठल्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचे, कोणती शाखा निवडायची, कोणत्या कोर्सला ऍडमिशन घेतल्यानंतर पुढे जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत असे अनेक प्रश्न निर्माण होतील. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन भारती विद्यापीठ तसेच रोटरी क्लब ऑफ़ जुळे सोलापूर या दोन्ही संस्थांनी एकत्रित येऊन ह्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. या वेबिनार (व्याख्यान) चे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या वेबिनार मध्ये विद्यार्थ्यांना तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभणार आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज काढायचे आहे अशा विद्यार्थ्यांनाही त्या बाबतीत मार्गदर्शन केले जाईल. हा वेबिनार सर्वांसाठी खुला व मोफत असून याची लिंक सोबत दिलेली आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थी व पालक यांनी या वेबिनार चा लाभ घ्यावा असे आवाहन अभिजित कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेस सोलापूर चे संचालक डॉ एस बी सावंत सर यांनी केले आहे. यावेळी रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूर चे अध्यक्ष श्री सचिन चौधरी सर, सचिव श्री माऊली झांबरे, अभिजित कदम इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. प्रीतम कोठारी, संगणक प्रमुख डॉ. ए बी नदाफ, या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. अविनाश ढवण हे उपस्थित होते. ऑनलाइन वेबिनार ची लिंक
https://www.facebook.com/RotaryClubOfJuleSolapur/videos/2745386495675052/


















