सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेतील आरोग्य विभाग सध्या कोरोनाग्रस्त झाला आहे. स्वतः जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतल जाधव हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत त्यांच्या नंतर आरोग्य विभागातील जावेद शेख,आणखी पाच ते सहा कर्मचारी यांना कोरोणाची लागण झाल्याची माहिती समोर आले आहे. तसेच याच इमारतीमधील शिक्षण विभागातील तीन कर्मचारी कोरूना पॉझिटिव्ह झाले आहेत जिल्हा परिषदेतील एकाच इमारतीमधील खाली वर असलेल्या विभागातील तब्बल अकरा जणांना कोरोनाची लागण झाले आहे.
याचबरोबर बऱ्याच कर्मचाऱ्यांना तशी लक्षणे असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय म्हणून समजले जाते. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांची वर्दळ मुख्यालयात पाहायला मिळते. सध्याची परिस्थिती पाहता जिल्हा परिषदेमध्ये निर्बंध आवश्यक असून कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्के करण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्या आहेत तसेच जिल्हा परिषदेला तीन प्रवेशद्वार असून या तीनही प्रवेशद्वारामधून येणाऱ्या जाणाऱ्यांची मोठी वर्दळ आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय कडे जाणारे गेट तसेच उपोषण गेट बंद केल्यास केवळ एकच प्रवेशद्वार राहील, कामं नसणाऱ्यांची गर्दी त्यामुळे कमी होईल, प्रमुख प्रवेशद्वारावर पोलिस बंदोबस्त मध्ये दोन लसीकरण घेतलेल्यांची तपासणी करून जर आत सोडले तर निश्चितच गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
जिल्हा परिषदेमध्ये आता अकरा जण पॉझिटिव्ह झाले आहेत त्याचे शंभर होण्यास जास्त वेळ लागणार नाही, त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी तातडीने मिनी मंत्रालयात कडक निर्बंध लावावेत अशी मागणी कर्मचाऱ्यांनी मधून होत आहे.
















