सोलापूर महापालिकेच्या स्ट्रीट बझार याठिकाणी बांधण्यात आलेल्या 8 बाय 6 च्या 34 ओपन गाळ्यांची लिलाव प्रक्रिया महापालिका प्रशासनाच्या वतीने बुधवारी ठेवली होती.
या लिलाव प्रक्रियेत एकूण 274 लोकांनी स्ट्रीट बझार येथील ऑफलाईन लिलाव मध्ये भाग घेतला.या लिलावप्रक्रिया मध्ये कागदपत्रांची छाननी करून मग लिलावास सुरुवात करण्यात आली. सर्वच्या सर्व गाळे अपेक्षित रकमेपेक्षा जास्त रकमेला बोली लावून घेतले.
प्रथम दिव्यांगासाठी असणाऱ्या गाळ्याचा लिलाव पुकारला गेला. त्याला अनपेक्षित 25 हजाराची बोली लागली. शेवटचा गाळा हा तर अनपेक्षित पणे तब्बल 26 हजार 500 रुपये महिना भाड्याने एका नागरिकाने घेतला आहे .एकूण 34 गाळ्यांपैकी 4 गाळे महिलांनी जास्तीत जास्त बोली लावून भाड्याने घेतले.
या लिलावासाठीची बेसिक किंमत लक्षात घेता एकूण 2,24,735 रुपये इतके उत्पन्न दरमहा अपेक्षित होते. पण बुधवारच्या लिलावातून आता 5,55,100 रुपये एवढे उत्पन्न दरमहा मिळेल.या लिलावातून महापालिकेला ऐकून 5,55,100 रुपये इतके उत्पन्न दरमहा महापालिकेला मिळेल.


















