सोलापूर महानगरपालिच्या वतीने श्रीकृष्ण मंगल कार्यालय येथे नियमांचे पालन न केल्यामुळे 10 हजार दंड करण्यात आले तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती येथे बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती येथील मेन गेटवरती तपासणी करूनच शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना व नागरिकांना सोडण्यात येईल तसेच मार्केट यार्ड मधील किरकोळ भाजी विक्रीते यांना सकाळी 9 पर्यंतच त्या ठिकाणी ठेवण्यात येईल व नंतर तो भाग रिकामा करण्यात येईल त्यानंतर सकाळी 10 वाजल्यापासून कांद्याचा लीलाव सुरु करण्यात येईल तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने जागोजागी हात धुण्यासाठी पाण्याची टाकीची व्यवस्था त्याठिकाणी करण्यात येणार आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती महापालिका व पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने शेतकरी, व्यापारी, हमाल, तोलार तसेच नागरिकांना त्याठिकाण कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे तसेच त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई ही महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, जोडभावी पेठे पोलीस स्टेशनचे API शिवाजी राऊत,विभागीय कार्यालय 3 चे लामखाने, मुख्य आरोग्य निरीक्षक केदार गोटे,आरोग्य निरीक्षक धीरज वाघमोडे, आरोग्य निरीक्षक संग्राम पाटील आदी उपस्थित होते. तसेच काल नवीपेठ येथे कोरोना संदर्भात जनजागृती करून त्या ठिकाणी 12 व्यक्तीकडून तीन हजार दोनशे रुपये दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आले. सकाळी मार्केट यार्ड येथे नागरिकांना व व्यापाऱ्यांना कोरोना संदर्भात प्रबोधन केले व नियम मोडणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात आले.
दिनांक 28.2.21
दंडात्मक कारवाई बाबत माहिती खालील प्रमाणे
——————
1. मास्क बाबत– 10,000/-
2. सोशल डिस्टन्स- 5,000/-
3. सार्वजनिक ठिकाणी घाण
केले बाबत—– 1950/-
4.मोठ्या प्रमाणात
कचरा साठा—– 3000/-
5.50 पेक्षा जास्त प्रमाणात
नागरिक लग्नकार्य
प्रसंगी-10,000/-
——————
ऐकूण— 30,450/-
या प्रकारे 40 नागरिका वर दंडात्मक कारवाई करण्यात आले आहे.