सोलापूर : बहुजन समाज पार्टी या पक्षाचा सोलापूर शहरात विशेष करून आंबेडकरी चळवळीचे केंद्र समजल्या जाणाऱ्या मिलिंद नगर, न्यू बुधवार पेठ रमाबाई आंबेडकर नगर या भागात चांगलाच जम आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या यापूर्वीच्या तीन निवडणुकांमध्ये बहुजन समाज पार्टीच्या नगरसेवकांची संख्या वाढत गेली आहे 2017 च्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टीचे तब्बल चार नगरसेवक निवडून आलेले नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली हे चारही नगरसेवक निवडून आले होते परंतु आता त्यापैकी एकही नगरसेवक समाज पार्टीमध्ये नाही.
स्वाती आवळे या महिला नगरसेविका भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या आहेत तर तीन नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, स्वाती बमगुंडे हे तिघेही आता सुरुवातीला वंचित बहुजन आघाडी व आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत चंदनशिवे यांनी तर उघड उघड राष्ट्रवादीला आपले केले आहे. या पार्श्वभूमीवर 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त बहुजन समाज पार्टीच्या वतीने अभिवादन कार्यक्रम झाला.
यावेळी शहराचे अध्यक्ष देवा उघडे यांनी अभिवादन पर प्रतिक्रिया देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित शासनकर्ती जमात होण्यासाठी बहुजन समाज पार्टीची वाटचाल सुरू आहे मात्र आंबेडकरी चळवळीवर मोठे होऊन नंतर राष्ट्रवादी आणि भाजपची सलगी करणे आणि आम्ही आंबेडकरी असल्याचे सांगणाऱ्या फुटीरांपासून आंबेडकरी जनतेने सावध राहावे असे आवाहन केले….. दरम्यान काय म्हणाले देवा उघडे पहा हा व्हिडीओ

















