सोलापूर : पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नूतन डीपीसी सदस्य बाळासाहेब बंडगर मामा यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदीवरील बंदलगी बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा विषय सभेत मांडला,बंधारा कुणी पाहणी करायला येत नाही, कारण काय? असा प्रश्न उपस्थित केला. दरम्यान पालकमंत्री भरणे मामांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित पाहणी करण्याची सूचना दिली व या बंधारा दुरुस्ती साठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कडून निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिले.


















