पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वृद्ध साहित्यिक व वृद्ध कलावंतांना मानधन देण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत केली आहे, त्या समितीच्या अध्यक्ष पदी जेष्ठ साहित्यिक प्रा. मारूती दगडू जाधव,मु.पो. पळशी ता. पंढरपूर यांची पालकमंत्र्यांनी नियुक्ती केली आहे. समितीचे सचिव हे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे हे आहेत, इतर सदस्यामध्ये प्रवचनकार ह.भ.प.महादेव पंढरीनाथ बोधले, मु.पो. धामनगाव, ता. बार्शी, शाहिर कलावंत सुभाष बाबुराव गोरे, मु. पो. जवळा, ता. सांगोला, जेष्ठ कवी, साहित्यिक शिवाजी महादेव सातपुते, मु. पो. नागणेवाडी,ता.मंगळवेढा, नकला व नाटककार आशितोष सदाशिव नाटकर कर्णिकनगर, सोलापूर, लोककलावंत श्रीमती मीरा बबन मुसळे मु.पो.मोडनिंब ता. माढा, बॅंडवादक बाळासाहेब संभाजी पारसे मु.पो.कोळेगांव ता.माळशिरस, प्रा. साहित्यिक श्री. राज भिमराव साळुंखे मु.पो. बोरामणी ता. दक्षिण सोलापूर व जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या जिल्हा पुनर्वसन अधिकारी मोहिनी चव्हाण हे समितीमध्ये सदस्य आहेत.


















