Monday, March 9, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

फ्लॅश ! जिल्ह्यात मान्सूनपूर्व अणुजैविक पाणी नमुने तपासण्याचे आदेश ; मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 June 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 


सोलापूर :-सध्याच्या मान्सून हंगामामध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावरील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता चांगली ठेवण्यासाठी १ जून २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत मान्सूनपूर्व अणुजैविक पाणी नमुने तपासणी अभियान राबविले जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.


    याबाबत सविस्तरपणे माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले , जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर एकूण ९४१७ इतके पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आहेत.तसेच १५२२ इतक्या नळ पाणी पुरवठा योजना आहेत.अशा एकूण १० हजार ९३९ इतक्या स्त्रोताचे पाणी नमुने जैविक तपासणीस पाठविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे.पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता चांगली रहावी आणि मान्सूनमध्ये पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दुषित होऊ नये पर्यायाने दुषित पाण्यामुळे गावात कोणतेही साथीचे रोग उद्धवू नयेत.म्हणून हे पाणी नमुने तपासणी ही वर्षातून मान्सुनपूर्व व मान्सुन पश्चात केली जाते.पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या दि.५ अॉक्टोबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक/आरोग्य सेवक यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील जलसुरक्षक यांनी पाणी टिसीएल पावडर (ब्लिचिंग पावडर) द्वारे शुद्धीकरण केले जाते. शुद्धीकरणानंतर या पाण्याच्या तपासणीसाठी सुमारे १५० ते २०० मिलीच्या प्रमाणात प्रत्येक स्त्रोताचे पाणी नमुने हे निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटीत घेऊन पाणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावयाचे आहेत.तसेच तपासणीअंती पाणी नमुना दुषित आलेल्या स्त्रोतांची पूर्नतपासणी केली जाते.

   सध्या जिल्ह्यात पाणी नमुने तपासणीसाठी जिल्ह्यातील उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर या तालुक्यासाठी सोलापूर येथे जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळा तसेच अक्कलकोट तालुक्यासाठी अक्कलकोट येथे , बार्शी तालुक्यासाठी बार्शी येथे , करमाळा तालुक्यासाठी करमाळा येथे ,माढा तालुक्यासाठी कुर्डूवाडी येथे , माळशिरस तालुक्यासाठी अकलूज येथे , पंढरपूर व मोहोळ तालुक्यासाठी पंढरपूर येथे , मंगळवेढा सांगोला तालुक्यासाठी सांगोला  उपविभागीय पाणी तपासणी प्रयोगशाळा कार्यरत आहेत.दरवर्षी पावसाळ्यात दूषित पाणी वाहून ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होतात म्हणून ग्रामस्थांना दिल्या जाणाऱ्या पाण्याचे नियमित शुद्धीकरण व निर्जंतुकीकरण करुन घेण्यासाठी व पाणी पुरवठा टाकीची (जलकुंभ ) स्वच्छता करुन घेणेसाठी जिल्हास्तरावरुन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) गोरख शेलार , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल कटकधोंड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षच्या माध्यमातून , सर्व तालुका स्तरावर गट विकास अधिकारी , तालुका वैद्यकीय अधिकारी व ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाचे उपअभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली तर गाव स्तरावर ग्रामसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली सनियंत्रण केले जाते.

    पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीने गावात पावसाळ्यात जलजन्य व किटकजन्य साथीचा उद्रेक टाळण्यासाठी योग्य पद्धतीने नियमित शुद्धीकरण प्रक्रिया करुन पाणी पुरवठा करणे , जलस्त्रोतांजवळचा व जलवाहिन्यांजवळचा परिसर स्वच्छ ठेवणे , पाणी पुरवठा यंत्रणांची वेळेवर व सुयोग्य देखभाल ठेवणे , गट विकास अधिकारी , तालुका वैद्यकीय अधिकारी व ग्रा.पा.पु.चे उपअभियंता यांनी दूषित पाणी नमुन्याबाबतचा आढावा घेऊन याबाबत आवश्यक ती उपाययोजना करुन जिल्हा स्तरावर अहवाल सादर करणे ,गावात सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होतो किंवा नाही याची पाहणी करुन आवश्यक त्या उपाययोजना करणे , डास , माशांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून स्वच्छता विषयक उपाययोजना करणे , पाणी शुद्धीकरणासाठी ३३ टक्के क्लोरीन असलेली ब्लिचिंग पावडर , सोडिअम हायपोक्लोराईड , तुरटी यांचा तीन महिने पुरेल एवढा साठा उपलब्ध करणे , पाणी पुरवठा करणारी यंत्रणा सुव्यवस्थित ठेवणे तसेच गावात वेळोवेळी पिण्यासाठी शुद्ध पाणी पिण्याची काळजी घेण्यासाठी जनजागृती अत्यंत आवश्यक असल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी सांगितले.दरम्यान यंदाच्या मान्सुनमध्ये जिल्ह्यातील ग्रामस्थांना पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी १ जून २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत मान्सूनपूर्व अणुजैविक पाणी नमुने तपासणी अभियानामध्ये पाणी नमुने ग्रामपंचायतींनी तपासून घ्यावेत असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) गोरख शेलार यांनी केले आहे.

——

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग ! विडी कामगारांसाठी खुशखबर ! सोमवारपासून कारखाने सुरू होणार, साहित्य मिळणार, कोरोना टेस्ट ही होणार

Next Post

फ्लॅश ! वृद्ध कलावंत मानधन समितीचे यांना मिळाले अध्यक्षपद ! व हे आहेत नवे सदस्य

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

फ्लॅश ! वृद्ध कलावंत मानधन समितीचे यांना मिळाले अध्यक्षपद ! व हे आहेत नवे सदस्य

ताज्या बातम्या

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971111
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group