“बार्शी शहरातील सुश्रुत हॉस्पिटलच्या डॉक्टर संजय अंधारे यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी वैतागलेल्या एका 33 वर्षीय युवकाने जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी चौकशी समिती नेमली आहे”
सोमवारी सकाळी बाराच्या सुमारास संदीप चत्रभुज सुतार राहणार बार्शी हे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आले त्यांनी घेतानाच अंगावर डिझेलचा डबा ओतून घेतला पोलिसांनी ते पाहिले आणि त्वरित पकडले त्याच्या हातातून डिझेलचा डबा हिसकावून घेतला उघडताच माध्यमांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते हे पाहताच माध्यमांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी आत्मदहन करण्यामागील कारण विचारले असता संदीप सुतार यांची आई बार्शीतील सुश्रुत हॉस्पिटल मध्ये कोरोनावर उपचार घेत होती त्या आयसीयूमध्ये दाखल होत्या मात्र त्याठिकाणी असलेले डॉक्टर संजय अंधारे यांनी व्यवस्थित उपचार केला नाही हॉस्पिटलमध्ये हलगर्जीपणा झाल्याने त्यांच्या आईचा मृत्यू झाला याबाबत सर्व पुरावे गोळा करुन सुतार यांनी जिल्हाधिकारी तसेच पालक मंत्र्यांना निवेदने दिली मात्र कोणतीही दखल घेतली गेली नाही शेवटी वैतागलेल्या संदीप सुतार यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात हा प्रकार केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात बंदोबस्तला असलेल्या पोलिसांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घालून दिली, जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशी समिती नेमली असल्याची माहिती मिळाली, दरम्यान पोलिसांनी सुतार यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात नेले.