सोलापूर : एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोलापुरात कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. शहराध्यक्ष फारूक शाब्दि यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा घेतला.
त्यांनी आपल्या भाषणात, मी नवखा असतानाही विधानसभा निवडणुकीमध्ये 38 हजाराहून अधिक मतदान दिल्याबद्दल सर्व सोलापूरकरांचे आभार मानले. मी राजकारणी नाही, मला तुमचा भाऊ म्हणून स्वीकारा, आपणाला महापालिकेमध्ये पक्षाची ताकद दाखवून द्यायची आहे,
त्यासाठी सोबत राहा असे आवाहन करत “अल्लाहने चाहा तो, इलेक्शन के बाद सत्ता की चाबी एमआयएम के पास होगी” असे सांगून आपल्या भाषणातून उपस्थितांची मने जिंकली पहा काय म्हणाले शाब्दी आपल्या भाषणात…


















