नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताने अनेक पदे पटकावली. त्या स्पर्धेत 4 × 400 मीटर रिले शर्यतीत महाराष्ट्राची ऐश्वर्या कैलाश मिश्रा हिने रौप्य पदक पटकावून भारताचे नाव जगाच्या इतिहासात नोंदविले. विशेष म्हणजे ऐश्वर्या ही मुंबईतील एका फळ विक्रेत्याची लेक आहे.
त्या रौप्य पदक विजेत्या ऐश्वर्या कैलाश मिश्रा या लेकीची भेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. भेटीदरम्यान तिच्या प्रवास आणि कर्तृत्वाविषयी जाणून घेतले. मुंबईतील एका फळविक्रेत्याच्या मुलीने आपल्या दमदार कामगिरीने देशासाठी रौप्य पदक पटकावणे, ही सर्वांसाठी कौतुकास्पद आणि प्रेरणादायी बाब असल्याचे गौरोद्गार फडणवीस यांनी काढले. ऐश्वर्याचे अभिनंदन करत तिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.