सोलापूर : जगभरातील नावाजलेल्या वाहन उत्पादकांना कॅमशाफ्ट्सचा पुरवठा करणाऱ्या प्रिसिजन उद्योगसमूहाने भारतात पहिली मध्यम आकाराची रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस बनविली होती.
दरम्यान प्रिसीजनने व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची सोलापूरात व मुंबईत भेट घेतली, या इलेक्ट्रिक वाहना संदर्भात पेपर प्रेझेंटेशन केले होते . त्यानंतर शनिवारी शहा हे एका पत्रकार परिषदेसाठी आले असता त्यांना पत्रकारांनी शरद पवार यांच्या भेटी बद्दल विचारले. ते म्हणाले, पहिल्या भेटीनंतर लगेच पाचव्या दिवशी त्यांनी मुंबईत बोलावले, संबंधित माणसांशी भेट घालून दिली, राज्य स्तरावर जेव्हा असे धोरण राबविले जाईल तेव्हा निश्चित त्याचा फायदा होईल असे सांगितले. यापुढे मी आता देशाचे रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे सांगितले
राज्य स्तरावर मी पवार यांना दाखवले आता देश लेव्हलला दाखवावं हा उद्देश आहे तो देशात राबवला जावा, याचा फायदा होऊ शकतो, पोल्युशन कमी होईल, डिझेल बचत मोठ्या प्रमाणात होईल, इलेक्ट्रिक व्हेईकल धोरण राबवायला वेळ लागेल .वेळ लागेल परन्तु भारत सरकारने जे धोरण तयार केले आहे, इलेक्ट्रिक व्हेईकल बाबत, गडकरी यांची भेट घेतल्यानंतर प्रेझेंटेशन तसे परफेक्ट करावे लागेल. त्याची तयारी करून तसे वाहन नेऊन भेट घेणार असल्याचे ते म्हणाले.

















