पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथे प्रा.डॉ.गौतम कांबळे यांची प्रभारी कुलगुरू पदी नियुक्ती झाल्याबद्दल कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष मनिष सुरवसे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हा सचिव अरविंद जेटीथोर यांच्या बरोबरच खातेनिहाय संघटनांचे जिल्हा परिषद सोलापूर शाखेचे अध्यक्ष अरूण क्षिरसागर, विद्यापीठ शाखेचे अध्यक्ष हैनाळकर, महसूल शाखेचे प्रसाद सोनवणे, सिव्हिल शाखेचे सचिन सोनवणे, भूमी अभिलेख शाखेचे प्रदिप कांबळे, आयटीआय शाखेचे एस.ए.लोहार तसेच महासंघाचे संघटक लक्ष्मण गायकवाड, सह सचिव विजय लोंढे आदी उपस्थित होते.

















