सोलापूर : शुक्रवारी सकाळी 11 वाजता सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलेल्या उत्तर सोलापूर पंचायत समिती सभापती वर अविश्वास ठरावाची सभा होती हा विषय संवेदनशील असल्याने अपेक्षित असा पोलिस बंदोबस्त लावायला हवा होता इतर निवडणुका असल्यास वेळेपूर्वीच पोलिस बंदोबस्त लावला जातो, मात्र सकाळी अकरा वाजता कोणताही बंदोबस्त नव्हता, याच वेळी सभापती रजनी भडकुंबे यांच्या वडीलांच्या अंगावर मार्डी गावचे युवक धावून गेले मारहाण झाली, दहा ते पंधरा युवक एकत्र येऊन मारहाण केली, मारहाण करून ते पसार झाले,
हा गोंधळ व मारहाण झाल्यावर सकाळी अकरा वीसच्या सुमारास पोलिसांचा ताफा दाखल झाला. अविश्वास ठराव संमत झाल्यानंतर पत्रकार जेव्हा पीठासीन अधिकारी हेमंत निकम यांच्या कडून माहिती घेतल्यानंतर विषय संवेदनशील असताना पोलीस बंदोबस्त का लावला नाही असा प्रश्न उपस्थित केला असता मी पोलिसांनी पत्र दिले मात्र पोलीस उशिरा आले, हाणामारी झाली यामध्ये कुणाच्या जीवाला धोका निर्माण झाला असता तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न पत्रकारांनी केला तेव्हा “टेक इट इजी” काय नाही झाले ना? असे बेजबाबदार पणे वक्तव्य केले.
कुणी काही न बोलता थेट काही युवकांनी मारहाण करण्यास सुरुवात केली मग ही मारहाण करण्याचा प्लॅन ठरला होता का?, जर पोलिसांनी पत्र दिले होते तर पोलीस उशिरा कसे आले? असे प्रश्न आता या घटनेनंतर उपस्थित होत आहेत.

















