सोलापूरचा सुपुत्र महागायक स्पर्धा विजेता मोहम्मद आयाज हे पूर्वीपासून काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या जवळचा म्हणून ओळखला जायचे. मात्र त्यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला सोडून थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला या प्रवेश या मागील त्यांची भूमिका समजली नाही मात्र त्याची सर्वत्र चर्चा झाली एकीकडे असताना दुसरीकडे मात्र कोरोना जनजाग्रृती गीताचे प्रकाशन सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते केले.
मोहम्मद अयाज यांनी गायलेल कोरोना जनजाग्रृती गीताचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी अखील भारतीय नाट्य परीषदेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार , गटनेते चेतन नरोटे सह मान्यवर उपस्थित होते. ” नाही अजून गेला कोरोना चा धोका, कधी कुठे साधेल कोरोना हा मोका” शासनाचे नियम पाळा। सावधान रहा, मास्क लावा, सँनीटायज करा, आणी गर्दी टाळा.. या गीताचे गायक व संगीतकार मोहम्मद अयाज असुन गीतकार मोरे आहेत.
प्रकाश माने यानी ध्वनिमुद्रण केले विडियो ग्राफी भारतीय कला स्टुडियो येथे करण्यात आला। लोकांमथे अजुन जागरूकता निर्माण व्हावी म्हणुन हे गीत तयार करण्यात आले.. नक्कीच सामान्य जनते पर्युंत हे पोहचेल अशी भावना अयाज यांनी व्यक्त केले..


















