सोलापूर : काँग्रेस भवनात गुरुवारी कोरोना महामारीत निस्वार्थ पणे सेवा बजावणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्स यांचा यथोचित गौरव काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला. धर्मा भोसले यांच्या जयंतीनिमित्त धर्मा भोसले सोशल फाउंडेशनच्या वतीने हा कार्यक्रम झाला. आमदार प्रणिती शिंदेंच्या हस्ते सेवारत्न या पुरस्काराने सर्वांना गौरविण्यात आले. यावेळी भाषणात शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी आपल्या भाषणात सोलापुरातील इतर पक्षांना टोला हाणला, त्यांनी भाषणात काँग्रेस कार्यकर्ते वगळता कोरोनामध्ये इतर कोणत्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम केले नाही असे ठामपणे सांगितले पहा ते काय म्हणाले हा व्हिडीओ


















