सोलापूर : जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाच्या प्रकल्प संचालकपदी अमोल जाधव हे गुरूवारी जॉईन झाले. सकाळी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेतली. स्वामी यांनी अमोल जाधव यांचे स्वागत केले. स्वामी यांनी या विभागातील सर्व पेंडिंग कामांचा निपटारा करण्याच्या सूचना केल्या. आता आषाढी वारी पार्श्वभूमीवर पाणी व स्वच्छता विभागाची महत्वपूर्ण भुमिका राहते.
अमोल जाधव हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब इथले रहिवासी असून त्यांनी लातूर व यवतमाळ या जिल्ह्यात प्रोबेशनवर काम केले आहे. यापूर्वी जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुका व अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात गट विकास अधिकारी म्हणून काम केले असून आता सोलापूर जिल्हा परिषदेत त्यांची तिसरी पोस्टींग आहे.



















