सोलापूर : तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त कोजागिरी पौर्णिमेसाठी लाखो भाविक सोलापूर तुळजापूर रस्त्यावरून पायी चालत जातात. त्यासाठी गुरुवार दिनांक 26 ऑगस्ट ते रविवार दिनांक 29 ऑगस्ट हे चार दिवस सोलापूर तुळजापूर हा मार्ग बंद करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त राजेंद्र माने आणि पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी घेतला आहे तसे आदेश दोन्ही अधिकाऱ्यांनी काढले आहेत.
श्री. क्षेत्र तुळजापूर येथे श्री. तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव दिनांक १५/१०/२०२३ ते दिनांक ३०/१०/२०२३ पावेतो साजरा होत आहे. दिनांक २८/१०/२०२३ रोजी कोजागीरी पोर्णिमा व दिनांक २९ / १० / २०२३ रोजी मंदिर पोर्णिमा निमित्त सोलापूर शहर, सोलापूर जिल्हयातील तसेच कर्नाटक राज्यातून मोठया संख्येने भाविक तुळजापूर कडे पायी चालत जात असल्याने वाहतुकीची कोंडी होवु नये, भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा अपघात होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये या करीता भाविक पायी चालत जाणारे मार्गावरील वाहने अन्य मार्गाने वळविणे करीता पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी दिनांक २४/१०/२०२३ रोजी वाहतुक नियमन जाहीरनामा निर्गमीत केला आहे.