सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश लागू आहेत, तसेच सोशल डिस्टन्स न पाळणे, मास्क न वापरणे, गर्दी केल्यास पोलीस प्रशासन गुन्हे दाखल करते, रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी शहर काँग्रेसचे सुमारे शंभर कार्यकर्ते चार पुतळ्यासमोर एकत्र आले त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नसल्याने फौजदार चावडी पोलिसांनी संतोष पवार कार्याध्यक्ष, भारत जाधव शहर अध्यक्ष, महेश कोठे, मनोहर सपाटे,तौफिक ईस्माईल शेख, दिलीप कोल्हे, इरफान मेहबुब शेख, जुबेर बागवान, अध्यक्ष युवक, विजय भुईटे, शफि ईनामदार, राजु कुरेशी, जनार्दन कारमपुरी, प्रमोद भोसले, फारुख मटके,बसवराज कोळी, लता डेरे, नलीनी चंदेले, सुनिता दादाराव रोटे, विद्या लोलगे, व इतर १० ते १५ इसमाच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत
पोलीस शिपाई नितीन दत्तात्रय मोरे यांनी याबाबत फिर्याद दिली असून कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे अनुषंगाने एकमेकांमध्ये सोशल डिसटन्सींग न ठेवता पोलीस आदेशाचे उल्लंघन करुन इतरांचे जिवीतास धोका निर्माण होईल असे हयगयीचे कृत्य केले आहे म्हणून हा गुन्हा दाखल झाला आहे.
सोलापूर शहरांमध्ये महापालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यास बंदी आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुद्धा कोरोना संसर्गामुळे होत नाही, मोठे राजकीय कार्यक्रम झाल्यास त्या आयोजकांवर गुन्हा दाखल होतो मागील काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचा मेळावा झाला त्याच्या संयोजकांवर गुन्हे दाखल झाले कॉंग्रेस पक्षाच्या कार्यक्रमानंतर गुन्हे दाखल झाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे सोलापूर शहरात हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये शहर आणि जिल्ह्याचा कार्यकर्ता मेळावा झाला दोन्ही कार्यक्रमाला हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती, सोशल डिस्टन्स नव्हता, मास्कचा वापर नव्हता, मात्र या संयोजकांवर अद्यापही गुन्हा दाखल झाला नाही, महानगरपालिकेने हुतात्मा स्मृती मंदिर एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला दिलेच कसे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जोपर्यंत महापालिकेचा कर्मचारी फिर्याद देत नाही तोपर्यंत पोलिस प्रशासन गुन्हा दाखल करणार नाही अशी माहिती सध्या मिळत आहे. त्यामुळे सोलापुरात आश्चर्य झाले राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा मेळावा झालाच नाही.


















