पृथ्वीराज माने युवा मंचच्या माध्यमातून माजी आमदार दिलीप माने यांचे चिरंजीव पृथ्वीराज माने यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध प्रश्नांवर शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला आहे, सोमवारी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची भेट देऊन निवेदन दिले,
यावेळी उत्तर पंचायत समितीच्या सभापती रजनी भडकुंबे, युवा मंचचे उत्तर तालुकाध्यक्ष सुनील जाधव, उमेश भगत, सचिव तात्या कदम, अजय सोनटक्के, ओंकार केंगार, उमाकांत काशीद, निलेश येलगुंडे, कमलाकर भोसले, विकास पाटील, प्रकाश पाटील, सौरभ शिंदे, शहाजी भोसले, अमित भडकुंबे, किरण बंडगर, सचिन ढेपे, राघव गरड, दत्ता सुरवसे, पप्पू साखरे, अजित पाटील, किरण हजारे,यांची उपस्थिती होती.
जिल्हा परिषद अखत्यारित असलेल्या प्राथमिक शाळा ऑनलाईन सुरू करणे, जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीचे विज बिलाचा शासनाने भरणा करूनही विज महामंडळाने विज बंद केलेली असून तातडीने सुरू करणे, डेंग्यूंचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना आवश्यक निधी खर्च करून धुरळणी व तणनाशक फवारणी लवकर करून घेण्याचे आदेश देणे अशा मागण्या करण्यात आल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर या विषयात कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
पृथ्वीराज माने यांनी दिली ही माहिती पहा हा व्हिडीओ


















