सोलापूर-रविवारी झालेल्या मोठ्या पावसाने सिना नदीस पुर आल्याने नदीकाठच्या तिर्हे, शिवणी गावास युवानेते पृथ्वीराज माने यांनी भेटी देऊन पहाणी केली. नागरीकांशी चर्चा केली यावेळी पुरामुळे इलेक्ट्रिक मोटारी वाहुन गेल्या, पिकांचे नुकसान झाले. शिवणी- तिर्हे गावाचा संपर्क तुटल्याचे दिसुन आले.मागील पुराची आठवणी पहाता नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन माने यांनी केले.
पाथरी रोडवर नदीकाठी असलेल्या भुईवस्ती व मल्लाव वस्ती येथील नागरीकांना पुराच्या संकटाची कसलीही रिस्क न घेता सुरक्षितेच्या दृष्टीने आपण स्थलांतरित व्हा.तुम्हाला जागा उपलब्ध करुन देतो असे माने यांनी सांगुन मतपरिवर्तन केले.
यावेळी पुरग्रस्त स्थितीची पहाणीसाठी आलेल्या तहशीलदार जयवंत पाटील यांच्याशी पृथ्वीराज माने यांनी चर्चा केली नदीकाठच्या नागरीकांना काळजी घेण्यास व सुरक्षितेसाठी यंत्रणेला सुचना दिल्याचे तहशीलदार पाटील यांनी सांगितले.
यावेळी भास्कर सुरवसे, गोवर्धन जगताप,अजय सोनटक्केअरविंद जाधव,बबलू सुरवसे,दादासाहेब मल्लाव, गणेश शिंदे, रमेश इरशेट्टी,सैपन शेख,बिभीषण मल्लाव,विशाल सुरवसे यांच्यासह तिर्हे गावातील नागरिक उपस्थित होते
▪️तालुका कृषी अधिकारी यांनी केले, माहीती देण्याचे आवहान
4 व 5 सप्टेंबर दरम्यान झालेल्या पावसामुळे विमा संरक्षितपिकाचे क्षेत्रजलमय होवून नुकसान झाले असल्यास स्थानिक आपत्ती बाबीखाली काढणी करुन ठेवलेल्या पिकाचे नुकसान झाले असल्यास काढणीपश्चात नुकसान या बाबीखाली शेतकऱ्यांनी विमा कंपनीस सुचना देण्याचे आवहान उत्तर सोलापूर तालुका कृषी अधिकारी मनिषा मिसाळ यांनी केले आहे.



















