सोलापूर : भाजपचे माजी खासदार अमर साबळे हे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर होते. त्यांनी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना नवे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पुणे जिल्हा गेल्याने नाराज आहेत ते सोलापूरला न्याय देतील का? असा प्रश्न विचारला असता साबळे म्हणाले, चंद्रकांत दादा हे गिरणी कामगारांचा मुलगा असून त्यांची जडणघडण संघाच्या विचारसरणीत झाली, त्यांनी राष्ट्रीय स्तरावर काम केलं असून राज्याच्या मंत्रिमंडळातील दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांच्यावर सोलापूर आणि अमरावतीचे जबाबदारी असून निश्चितच सोलापूरकरांना त्यांचा चांगला अनुभव येईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
सोलापुरात हत्तुरे फॅमिलीला धक्का ; महापालिकेपूर्वी मैनुद्दीन तडीपार
सोलापुरात हत्तुरे फॅमिलीला धक्का ; महापालिकेपूर्वी मैनुद्दीन तडीपार सोलापूर महानगरपालिका निवडणुकीपूर्वी शहरातील हत्तुरे फॅमिलीला मोठा धक्का बसला असून नगरसेवक पदासाठी...