विजापूर रोडवरील केटरिंग कॉलेज येथील कोविड केअर सेंटर ला खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.
सध्या केटरिंग कॉलेज येथील कोविड केअर सेंटर येथे 60 रुग्ण दाखल आहेत. उत्तम व्यवस्था केल्याने रुग्ण समाधानी असल्याचे पहावयास मिळाले. मानसिक व शरीरिक स्वास्थ्य उत्तम ठेवत रुग्णांनी नेहमी सकारात्मक विचार करावा. उपस्थित रुग्णांना उत्तम मनोबल ठेवण्याचे मार्गदर्शन खा. डॉ. जयसिद्धेश्र्वर महास्वामी यांनी केले. खा. महास्वामी यांनी रुग्णांच्या संख्येतील आकडेवारी घेत सध्या लक्षणे आढळणारे रूग्णसंख्येत घट होत आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांनी लक्षणे आढळल्यास वेळ वाया न घालविता तात्काळ तपासणी करीत विलागुकरनq कक्षात दाखल व्हावे. त्यामुळे पुढे वाढणारा धोका कमी होईल. गांभीर्याने घेत लक्षणे आढळताच उपचार केल्यास आजार निश्चित बरा होतो असेही खा.डॉ. महास्वामी यांनी सांगितले.
यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्याचे तहसीलदार अमोल कुंभार, गट विकास अधिकारी राहुल देसाई, डॉकटर, परिचारिका इतर कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते.

















