सोलापूर जिल्हा परिषदेत परमेश्वर राऊत हे अधिकारी चांगलेच चर्चेत होते, त्यांना सोलापूरातच थांबायचे होते म्हणून त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत साठी फिल्डिंग लावली होती मात्र त्यात त्यांना यश आले नाही, शेवटी त्यांना सोलापूरच्या जवळच उस्मानाबाद जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभाग मिळाले पण तिथं त्यांचं मन लागेना त्यांनी सोलापूरात रिक्त असलेल्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक पदासाठी पुन्हा फिल्डिंग लावली होती, शेवटी प्रमोशन झाले पण त्यांना अपेक्षित सोलापूर मिळाले नाही त्यांची बदली शासनाने एमएसआरएलएम अतिरिक्त संचालक सिडको भवन मुंबई येथे केली आहे. त्यामुळे सोलापूरला येता आले नाही.
सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य वित्त व लेखा अधिकारी महेश आवताडे यांची वेळेपूर्वीच सांगली जिल्हा परिषदेला बदली झाली, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ हे अवताडे यांना सोडण्यास राजी नव्हते आणि त्यांच्या जागेवर आलेले अजयसिंह पवार यांना त्यामुळे लवकर चार्ज मिळाला नाही शेवटी त्यांना जावेच लागले. परंतू त्यांनीही केवळ एका वर्षात आपली बदली पुणे जिल्हा परिषदेमधील मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदी करून घेतल्याची माहिती मिळाली.

















