सहाय्यक आयुक्त (मागासवर्ग कक्ष) पुणे विभाग पुणे यांचेकडील क्रं. मावक/वशी / ६ / २०२० दिनांक २३ / १२ / २०२० चे पत्रान्वये ग्रामसेवक (गट-क) या संवर्गातून ग्राम विकास अधिकारी (गट-क) या पदाची बिंदू नामावली पडताळणी केलेबाबतचे पत्र प्राप्त आहे. ३०.११.२०२० अखेर ग्रामविकास अधिकारी यांची एकूण २०५ पदे मंजूर असून ७५ % पदोन्नतीचा कोटा असून पदोन्नतीसाठी एकूण १५४ पदे मंजूर आहेत. खुल्या प्रवर्गास ६७ टक्केप्रमाणे १०३ पदे असून खुल्याची ५८ पदे कार्यरत आहेत व खुल्याची ४५ पदे रिक्त आहेत. ३१ मे २०२१ रोजी एक ग्रामविकास अधिकारी सेवानिवृत्त झालेने ही पद रिक्त झालेले आहे. एकूण ४६ व दिव्यांग कर्मचारी १ असे एकूण ४७ ग्रामसेवक यांना ग्रामविकास अधिकारी पदी नियुक्ती देण्यात आली.
यापूर्वी सन २०११-१२ मध्ये ग्राम विकास अधिकारी पदी पदोन्नती देण्यात आलेली होती. त्यानंतर १० वर्षानंतर दिनांक ०१/०६/२०२१ रोजी ४७ ग्रामसेवक यांना ग्रामविकास अधिकारी पदी पदोन्नतीने नियुक्ती देण्यात आली. यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन (DNE १३६) वतीन गेले वर्षभर सतत पाठपुरावा करण्यात येत होता. या पाठपुराव्याला आज यश प्राप्त झाले. यामुळे ग्रामसेवक संवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
याबद्दल महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन (DNE १३६) यांच्या वतीने सीईओ दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जून गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) चंचल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) परमेश्वर राऊत, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, तसेच सुहास चेळेकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी व नरसिंह गायकवाड, ग्रामसेवक आस्थापना लिपीक यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी शरद भुजबळ, जिल्हाध्यक्ष नारायण ढवळे, जिल्हा कार्याध्यक्ष दयानंद पाटील, जिल्हा सरचिटणीस, काशिनाथ घोंगडे, चेअरमन, नितीन वाघमारे, दिपक गोरे, नेल्लूरे, सचिन खरात, पंढरपूर व पदोन्नत ग्रामविकास अधिकारी मुंजे, झुंजा, शहा उपस्थित होते.




















