सोलापूर ! महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभाग कॉंग्रेसचे अध्यक्ष एम एम शेख यांचा रविवारी वाढदिवस होता, शेख मुंबईत असतात, मात्र सोलापूरात त्यांचा वाढदिवस साजरा झाला, नगरसेवक तथा शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष तौफिक हत्तुरे यांनी काँग्रेस भवनात त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने केक कापला, सर्वांनी एकत्रित बुके धरून प्रतिकात्मक सत्कार ही केला, यावेळी शहर अध्यक्ष प्रकाश वाले, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष वसीम पठाण, नगरसेवक रियाज हुंडेकरी, हसीब नदाफ, रुस्तुम कंपली, शकील मौलवी, भारत जाधव, यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
शहर जिल्ह्याच्या अल्पसंख्याक अध्यक्षांनी आपल्या प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस साजरा करून नेत्याला खुश करण्याचा प्रयत्न केला खरा पण दुसरीकडे काँग्रेसची खरी ताकद व मोठी व्होट बँक असलेला मुस्लिम समाज दिवसेंदिवस दूर होत जातोय, त्याचे आत्मचिंतन केले जात नाही.
पूर्वाश्रमीचे तौफिक शेख हे एमआयएम मध्ये गेले आता राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जात आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांचा निश्चितच फायदा होणार आहे , एमआयएमचे शहराध्यक्ष फारूक शाब्दी हे नवखे असताना ही पक्षाची युवा, महिला, कामगार, विद्यार्थी, वाहतूक, आरोग्य अशा विविध सेल सुरू करून समाजातील सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
हे निश्चितच काँग्रेसला आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने अडचणीचे आहे, काँग्रेसचा अल्पसंख्याक विभाग करतो काय असा प्रश्न आहे, केवळ कुणाच्या तरी वाढदिवसाचा केक कापण्यासाठी एकत्र यायचे का? 15 पैकी तब्बल 6 नगरसेवक मुस्लिम समाजातील आहेत, अजूनही समाजामध्ये जाऊन पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात नसल्याचे चित्र आहे, साहेबांचा किंवा ताईंचा वाढदिवस असेल तर केवळ पेपराच्या जाहिरातीत हे सर्व नेते एकत्रित दिसतात. इतर वेळी मात्र नाही.
काँग्रेस कडे यु एन बेरिया, आरिफ शेख, बाबा मिस्त्री, रियाज हुंडेकरी, शौकत पठाण, तौफिक हत्तुरे, कोमारो सय्यद, नगरसेविका फिरदोस पटेल, शकील मौलवी, जाबीर अल्लोळी, हसीब नदाफ, रुस्तम कंपली, मकबूल मोहोळकर, नगरसेविका परवीन इनामदार यांच्यासह त्यांचे पती, सोहेल कुरेशी, सादिक कुरेशी, वाहिद विजापूरे, मन्सूर गांधी असे अनेक नेते व कार्यकर्ते काँग्रेसकडे आहेत, ते सर्व एकत्र येऊन का काम करत नाहीत, का फक्त सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांच्याच जोरावर निवडणूका लढवायच्या का? असा प्रश्न उपस्थित होतोय.



















