सोलापूर : नांदेड जिल्ह्यामधील बाढोर हवेली या गावात आंबेडकर जयंती साजरी केल्यामुळे जातीद्वेषातून अक्षय भालेराव या युवकाची हत्या करण्यात आली त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या जिल्हा प्रतिनिधी वैशाली उबाळे, जिल्हा सचिव संजीव दुपारगुडे, कर्नाटक इन्चार्ज साधना गायकवाड, हिराबाई सुरवसे, कोंडाबाई लालसरे, आकाश गजघाटे, शशी कांबळे, आकाश वाघमारे, अनिकेत लोंढे, अशोक इंगळे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना वैशाली उबाळे व साधना गायकवाड यांनी नांदेड इथल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. या घटनेतील मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, याचा तपास सीबीआय मार्फत व्हावा आणि मृत भालेराव यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा अन्यथा समता सैनिक दल युवरा आंदोलन छेडेल असा इशारा दिला…



















