सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदी किरण लोहार यांनी सोमवारी पदभार घेतला, त्यांनी सकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेतली, सीईओ स्वामी यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे उपस्थित होते.
दोन महिन्यांपूर्वी शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांची बदली झाली होती, त्यांच्या जागेवर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांची नियुक्ती झाली होती मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी राठोड यांना रिलिव्ह केले नाही, बरीच कामे पेंडिंग होती म्हणून थांबवून घेतले होते, शेवटी राठोड यांनी आपली बदली सांगली जिल्ह्या परिषदेत शिक्षणाधिकारी म्हणून बदली करून घेतली, दरम्यान लोहार यांना स्वामी यांनी शाळेची गुणवत्ता वाढ आणि पटवाढीसाठी कामाला लागा अशा सूचना दिल्या. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर उपशिक्षणाधिकारी संजय जावीर गटशिक्षणाधिकारी बापूसाहेब जमादार उपस्थित होते.
















