विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क चौक) येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा च्या पाठीमागील बाजूस असलेली नार्थकोट प्रशालेची चार एकर जागा संविधान भवन, सुसज्य अभ्यासिका, व वस्तीगृह उभारण्यास हस्तांतर होणे बाबत कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभाग मंत्री नवाब मलिक यांची अपक्ष गटनेते आनंद चंदनशिवे यांनी भेट घेतली.
कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभाग मंत्री नवाब मलिक यांची गटनेते आनंद चंदनशिवे व इतर सदस्य यांच्या सह मंत्रालय मुंबई येथील कार्यालयात बैठक संपन्न झाली व नार्थकोट प्रशाला येथील 1 एकर जागा उपलब्ध करून दिल्या बदल सन्मानचिन्ह व शाल बुके देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यासन अधिकारी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग यांच्याकडून 5 /3 /2021 रोजी पत्र प्राप्त झाले असून या पत्रान्वये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क चौक) पुतळा मागील असणारी महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला तथा औद्योगिक शाळा येथील एक एकर जागा महापालिकेकडे हस्तांतर करण्यास मान्यता मिळाली होती. सोलापुर शहरातील आंबेडकरी अनुयायी व इतर नागरिक यांची संविधान भवन, सुसज्य अभ्यासिका, व वस्तीगृह उभारण्याबाबतची भावना लक्षात घेऊन नार्थकोट प्रशालाची एक एकर जागा अपुरी पडणार असून उर्वरित आणखी 4 एकर जागा आवश्यक आहे.
आनंद चंदनशिवे यांनी दिनांक 24 /9 /2021 रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विषय क्रमांक 108 ला अनुसरून नार्थकोट प्रशाला येथील उपलब्ध असलेली एक एकर जागा अपुरी पडणार आहे येथील आणखी चार एकर जागा शिल्लक असून सदरची जागा संविधान भवन सुसज्ज अभ्यासिका वस्तीग्रह उभारण्या करिता हस्तांतर करण्या बाबत उपसूचना मांडली याला ठराव क्रमांक 185 द्वारे सभागृहामध्ये मान्यता मिळाली आहे.
अशा आशयाचे निवेदन कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभाग मंत्री नवाब मलिक यांना देण्यात आले. या बाबत त्वरीत कार्यवाही साठी प्रस्ताव पाठवून योग्य ते सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आनंद चंदनशिवे यांच्या सोबत नगरसेवक गणेश पुजारी, इरफान शेख सामाजिक कार्यकर्ते बाबुराव बनसोडे, सुहास सावंत, अतिश गवळी, भीमा मस्के आदी उपस्थित होते.



















