सोलापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणेकामी सोलापूर महानगरपालीका आयुक्तांनी शासनाच्या नियमाची अंमलबजावणी करणेकामी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणेबाबत सूचना दिल्या आहेत. सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशामधील सुचनांचे उल्लंघन केल्याने नई जिंदगी येथील हिंदूस्तान बेकरी ३० दिवसांकरिता सिल करण्यात आली.
या बेकरीतील फारुख गुलाबसाब सौदागर यांना २३ फेब्रुवारी नियमांचा भंग केल्याप्रकरणी २ हजार रुपयांचा दंड आकारून, पुन्हा तसे झाल्यास कारवाई करुन त्यांची आस्थापना ३० दिवसांकरीता बंद करण्यात येईल, याची समज देण्यात आली होती.
शनिवारी, फेब्रुवारी रोजी फारुख गुलाबसाब सौदागर व हिंदुस्तान बेकरीचे मालक वसीम अ.सत्तार नदाफ हे पुन्हा कोरोना एसओपीचे उल्लंघन करताना आढळून आल्याने त्यांचेवर मा . मनपा आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे कारवाई करुन सदर आस्थापना 30 दिवसांकरीता सिल करण्यात आली.
ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उप आयुक्त श्रीमती वैशाली कडूकर, सहा.पोलीस आयुक्त (विभाग _१) कमलाकर ताकवले यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि संजय पवार, पोनि विश्वनाथ सिद, सपोनि खांडेकर, सपोनि पेटकर, पोसई बाडीवाले व पथकाने केली.