सोलापूर : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दक्षिण सोलापूर तालुक्यातील निम्बर्गी या गावी काँग्रेस कार्यकर्ता जनसंपर्क मोहीम अभियानाचे आयोजन करण्यात आले होते निम्बर्गी या गावात कार्यक्रम घेण्यास सपुरे विरोधकांनी विरोध केल्याची चर्चा ऐकण्यास मिळाली मात्र मोठ्या जंगी स्वरूपात एखाद्या विधानसभेची सभा असल्याप्रमाणे हा मेळावा झाला सुरुवातीला भाषणात सुरेश हसापुरे यांनी मोहिते पाटील यांच्यावरील आपलं प्रेम व्यक्त केलं.
मोहिते पाटलांकडे असताना सर्व निवडणुका मी जिंकल्या जेव्हा काँग्रेस मध्ये आलो तेव्हा सगळ्याच निवडणूक आम्ही हरलो आता पुन्हा मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करायला मिळाले आहे दादा तुम्ही कोणाचे ऐकू नका, सांगणारे खुप आहेत मात्र त्या कार्यकर्त्याचे काम बघा तुमचा नेतृत्वाखाली काम करून जिल्ह्यात काँग्रेस मजबूत करेन अशी ग्वाही हसापुरे यांनी दिली.
शेवटी आपल्या भाषणात जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी काँग्रेस पक्ष मजबूत करणे गरजेचे असल्याचे सांगितले, आता ज्येष्ठांनी थोडं थांबावं, युवकांना संधी द्यावी असे सांगतानाच धवलसिंह मोहिते-पाटील हलक्या कानाचा नाही सुरेश हसापुरे हे आमच्या मोहिते-पाटील कुटुंबीयांचा आहे त्यामुळे म्हेत्रे साहेब तुमच्या पेक्षा जास्त अधिकार माझा हसापुरे यांच्यावर आहे त्यामुळे कुणाला किती सन्मान द्यायचा हे मला ठाऊक आहे कार्यकर्त्यांना निश्चित संधी मिळेल असे सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली…


















